
मुंबई : विधीमंडळाच्या पायऱ्यांवरील धक्काबुक्कीच्या धक्कादायक प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, अशी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले की, आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल, तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, असे म्हणत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्या आत कुणी येऊ नये, असे गोगावले म्हणाले.
आमच्या मार्गात आले तर आम्ही सोडणार नाही, असे ते म्हणाले. त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली असे म्हणत आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असून, आम्ही डरपोक नसल्याचे गोगावले यांनी म्हटले आहे.
आम्ही बोलताना त्यांनी येऊन पायऱ्यांवर गोंधळ घालायचा हा कुठला प्रकार आम्ही काय बांगड्या भरल्यात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही जसात तसे उत्तर त्यांना आम्ही दिले आहे.