मध्य रेल्वेच्या १० एसी लोकल आजपासून तात्पुरत्या रद्द

मुंबई (वार्ताहर) : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी १० एसी लोकल सुरू केल्या. मात्र या एसी लोकलमुळे सर्वसामान्य प्रवाशांना उलट त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे या एसी लोकल बंद करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. त्याची दखल घेत या एसी लोकल उद्या गुरुवार २५ ऑगस्टपासून तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.


मध्य रेल्वेवर एसी लोकल सुरू केल्यामुळे सामान्य लोकलच्या वेळा बदलल्या होत्या. यामुळे सकाळी कामावर जाताना आणि विशेष म्हणजे संध्याकाळी कामाहून घरी परतताना मोठ्या प्रमाणात लोकलला गर्दी होत होती. यामुळे लांब पल्ल्याला राहणाऱ्या प्रवाशांचे हाल होत होते. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला गेला.


संतप्त झालेल्या प्रवाशांनी आणि बदलापूर येथील रेल्वे प्रवाशी संघटनेने याबाबत बदलापूर स्थानकावर गोंधळ घातला होता तसेच याबाबत अनेक निवेदन देखील रेल्वेला देण्यात आली आहेत. तर आपापल्या भागातील नगरसेवकांना भेटून देखील निवेदन दिली गेली. जेणेकरून ते निवेदन रेल्वे पर्यंत पोहचेल. या निवेदनात एसी लोकल बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच खोपोली, बदलापूर येथे रेल्वेसेवा वाढवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.


याची दखल घेत या एसी लोकल उद्या गुरुवार २५ ऑगस्टपासून तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या १० एसी सेवा सध्याच्या वेळापत्रकानुसार नॉन-एसी सेवा म्हणून चालवल्या जातील. एसी लोकल पुन्हा सुरू करण्याची तारीख पुनरावलोकनानंतर कळवली जाईल, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित