मुंबई : मुंबईतील ललित हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर एकच खळबळ उडाली असून, सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर या हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
धमकी देणाऱ्या व्यक्तीने हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. तसेच हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले बॉम्ब निकामी करण्यासाठी अज्ञाताकडून ५ कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली. यानंतर हॉटेल प्रशासनाकडून पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
धमकीनंतर पोलिसांनी यासाठी सायबर पोलिसांचीदेखील मदत घेतली जात आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासामध्ये कोणतीही ठोस अशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, फोन करून धमकी देणारी व्यक्ती नेमकी कोण, असे करण्यामागे नेमका उद्देश काय? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
दरम्यान, धमकीनंतर हॉटेलची तपासणी केली असता या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्फोटकं आढळून आली नाही. त्यामुळे हा फेक कॉल होता हे उघड झाले आहे.
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…
मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८…
मुंबई : “ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीरला जाणाच्या सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून…
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…