नवी दिल्ली : २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार राहुल द्रविडची यूएईला जाण्यापूर्वी कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती. राहुल द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण आशिया चषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावताना दिसू शकतात.
आशिया कपमधूनच राहुल द्रविड कदाचित बाहेर जाऊ शकतात. मात्र, बीसीसीआयकडून राहुल द्रविडबाबत अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट जारी करण्यात आलेले नाही. यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणला झिम्बाब्वे दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक म्हणून पाठवण्यात आले होते. इतकेच नाही तर लक्ष्मण गेल्या तीन महिन्यांपासून टीम इंडियाशी जोडला गेला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यातही लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक होता. केएल राहुल आणि व्हीव्हीव्हीएस लक्ष्मण यांनी झिम्बाब्वेविरुद्ध क्लीन स्वीप केला.
आशिया कपसाठी टीम इंडिया आज यूएईला रवाना होणार आहे. मात्र, राहुल द्रविड टीम इंडियासोबत यूएईला रवाना होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वेहून यूएईला आलेल्या खेळाडूंसह आशिया कपसाठी टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. आशिया चषक स्पर्धेतील टीम इंडियाची मोहीम २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. संघाला पहिल्याच सामन्यात पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाशी टक्कर द्यावी लागणार आहे.
मुंबई : शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे.…
मुंबई : आतापर्यंत अनेकांना पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या वाघांबद्दल माहिती आहे. हे वाघ अनेक राज्यात…
नवी मुंबई : भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचा म्होरक्या नवीन चिचकरचे वडील आणि नामांकित बांधकाम…
मुंबई : मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून बेस्टची ओळख आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होण्यासाठी…
'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला मुंबई : करण जोहरने (Karan Johar) नुकतेच त्याच्या नव्या चित्रपटाची…
नवी दिल्ली : वक्फ (दुरुस्ती) कायदा २०२५ ला (Waqf Amendment Act 2025) आव्हान देणाऱ्या याचिकांवर…