Monday, July 15, 2024
Homeमहामुंबईअशोक पाटील अखेर शिंदे गटात सामील!

अशोक पाटील अखेर शिंदे गटात सामील!

मुंबई (वार्ताहर) : ठाकरे गटातील गळती काही थांबण्याचे नाव नाही. भांडुपचे माजी आमदार अशोक पाटील हे शिंदे गटात सामील झाले. शेकडोहून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांना घेऊन अशोक पाटील हे शिंदे गटात सामील झाले. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी शेकडो आजी माजी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला बसलेल्या धक्क्यांची मालिका सुरूच आहे.

गेल्या काही दिवसांपासून अशोक पाटील हे नाराज असल्याची चर्चा भांडुपमध्ये सुरू होती. भांडुपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून अखेर शिंदे गटाची वाट धरत असल्याचे अशोक पाटील यांनी सांगितले. ‘शिंदे गटात सामील होणाऱ्यांचे हातपाय तोडू! अशी धमकी जेव्हा दिली जाते, त्यामुळे व्यथित होऊन आपण हा निर्णय घेतला आहे. “जर कुणी आमचे हात पाय तोडणार असतील “तर त्यांनी तारीख आणि वेळ सांगावी,” असा आव्हानात्मक निर्वाणीचा इशारा अशोक पाटील यांनी दिला.

यावेळी, ईशान्य मुंबई विभाग संघटिका संध्या वढावकर, माजी नगरसेविका मीनाक्षी अशोक पाटील, महिला उपविभाग संघटिका राजश्री राजन मांदविलकर, महिला शाखा संघटक सुरेखा पांचाळ, माजी शाखाप्रमुख कृष्णा शेलार, माजी शाखाप्रमुख विजय परब, उपशाखाप्रमुख संजय दुडे, अनंत जाधव, अविनाश बागुल, नितीन शिंदे, अंकुश करांडे, जगदीश शेट्टी, उदय महाडिक, संजय शिंदे, रमेश टक्के, अलका सावंत, सोनल गिरी, आशा साळवी, शितल बडदे, माधुरी वाघेला, नंदा वाघेला या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी अशोक पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -