मुंबई : मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर शुक्रवारी गोपाळकालाच्या सार्वजनिक सुट्टी दिनी कोविड लसीकरण बंद राहणार आहे.
शनिवार, दिनांक २० ऑगस्ट २०२२ पासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकर नागरिकांनी मुंबई पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.