मुंबई (वार्ताहर) : रेल्वे ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर आणि बोरीवली, कांदिवली स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक असेल.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, ब्लॉक कालावधीत डाऊन फास्ट मार्गावरील सर्व उपनगरी गाड्या अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर चालवल्या जातील.
सर्व डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान लाईन ५ वर धावतील. ब्लॉकमुळे काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. या संदर्भात सविस्तर माहिती स्टेशन मास्तरांकडे उपलब्ध आहे.