नवज्योत देशमुखला आयर्नमॅन ट्रायथलॉनचे विजेतेपद

कर्जत (वार्ताहर) : कर्जतमधील पोटल येथे राहणारा नवज्योत देशमुखने नुकतीच कझाकिस्तान येथे झालेल्या आयर्नमॅन ट्रायथलॉन या स्पर्धेत विजेतेपद पटकावले.


आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून या आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेची क्रीडाविश्वात ख्याती आहे. या स्पर्धेत सलग ३.८ किमी खुल्या जलप्रवाहात एकाच वेळी २००० स्पर्धकांसोबत पोहणे, त्यानंतर लगेच प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याविरुद्ध १८० किमी सायकलिंग करणे आणि लगोलग ४२.२ किमी धावणे ही अवघड आव्हाने पूर्ण करायची असतात.


भारताचे प्रतिनिधित्व करत असताना हे आव्हान नवज्योत देशमुखने १३ तास ३० मिनिटांत पूर्ण केले. या स्पर्धेसाठी त्यांना पुणे येथील आयर्नमॅन प्रशिक्षक चैतन्य वेल्हाळ (पॉवरपीकस अॅकॅडमी)चे मार्गदशन मिळाले. ही स्पर्धा जिंकणारा तो कर्जत रायगडमधील पहिला खेळाडू ठरला आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

राज्यातील १४३ बँकांवरील निर्बंध आरबीआयने हटविले

पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यातील आर्थिक अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बँकांवर सर्वसमावेशक निर्बंध (ऑल

दिवाळीच्या फटाक्यांमुळे तब्येतीला धोका!

मुंबई : दिवाळीमध्ये फटाक्यांची रोषणाई खूप छान दिसते, पण त्यामुळे हवेचे प्रदूषण खूप वाढले आहे. त्यामुळे

कॅन्डेला कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची मंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी

मुंबई : कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानानेयुक्त बोटी लवकरच मुंबईत दाखल होतील. यामुळे मुंबईच्या जलवाहतूक

कमालच झाली! भंगारातून रेल्वेला मिळाले २,२३५ कोटी रुपये!

स्वच्छ भारत अभियान ५.० अंतर्गत केली सुमारे १.४५ लाख चौरस फूट कार्यालयीन जागा मोकळी नवी दिल्ली : स्वच्छ भारत अभियान

तुम्ही पंतप्रधान होण्याच्या लायकीचे नाही; अमेरिकन गायिकेने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला अमेरिकन पॉप

आरबीआयच्या पब्लिक सिक्युरिटीज बाँडचे निकाल जाहीर

प्रतिनिधी:बाजारातील तरलता नियंत्रित करताना गुंतवणूक निधी उभारणीसाठी आरबीआयटडून बाँड विक्रीसाठी उपलब्ध