Tuesday, March 18, 2025
Homeमहामुंबईकोकेनसह परदेशी महिलेला अटक

कोकेनसह परदेशी महिलेला अटक

मुंबई (वार्ताहर) : सुमारे चार कोटी रुपयांच्या कोकेनची तस्करी केल्याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने परदेशी महिलेला अटक केली. महिला तिच्या पाकिटात कोकेन लवपून आणत होती. मुंबईत एका व्यक्तीला तिला कोकेन द्यायचे होते. पण त्यापूर्वी विमानतळावर तिला सीमाशुल्क विभागाने अटक केली.

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम आफ्रिकन देश सिएरा लिओन येथील नागरिक असलेल्या बिंटू जनेह या महिलेला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडवले. तिच्या पाकिटाची तपासणी केल्यानंतर ५०० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले, असे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याची किंमत ३ कोटी ८० हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

पैशांची गरज असल्यामुळे आपण कोकेनची तस्करी करण्यास होकार दिला होता, असे चौकशी दरम्यान महिलेने सांगितले. अमली पदार्थ दिल्यानंतर तिला मुख्य आरोपींकडून काही रक्कम मिळणार होती. तिला अदिस अबाबा येथे कोकेन देण्यात आले. मात्र, ते कोणाला द्यायचे याबाबतची कोणतीही माहिती तिला नाही. या प्रकरणी आरोपी महिलेला अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -