Friday, March 28, 2025
Homeदेशकोरोना, मंकीपॉक्सनंतर आता ‘टोमॅटो फ्लू’चा धोका

कोरोना, मंकीपॉक्सनंतर आता ‘टोमॅटो फ्लू’चा धोका

भारतात ८० पेक्षा जास्त मुलांना लागण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात कोरोना व्हायरस आणि मंकीपॉक्स व्हायरसनंतर आता टोमॅटो फ्लूने डोके वर काढले आहे. टोमॅटो फ्लू चा धोका आता वाढू लागला असून भारतात टोमॅटो फ्लूची ८० संभाव्य प्रकरणे आढळून आली आहेत.

८० पेक्षा जास्त मुलांना याची लागण झाली आहे. टोमॅटो फ्लूच्या लक्षणांमध्ये थकवा, मळमळ, उलट्या, ताप, सांधे सूज इत्यादींचा समावेश आहे. यात मुलांच्या शरीरावर लाल रंघाची फोड तयार होतात. टोमॅटो फ्लूचे नाव शरीरावर येणाऱ्या लाल रंगाच्या फोडांवरुन ठेवण्यात आले आहे. या लाल रंगाच्या फोडांचा आकार हळूहळू टोमॅटोसारखा वाढतो. टोमॅटो फ्लूमुळे त्वचेवर पुरळ उठतात, ज्यामुळे रुग्णाच्या त्वचेवर जळजळ होते.

या टोमॅटो फ्लूमध्ये सामान्य इन्फ्लूएंझा सारखी लक्षणे आहेत. डॉक्टरांनी फोडांच्या पुरळांची तुलना मंकीपॉक्सशी आणि तापाची तुलना डेंग्यू, चिकनगुनिया आजाराशी केली आहे. शरीरावर ही लक्षणे कशामुळे दिसतात हे शोधण्याचा संशोधक अजूनही प्रयत्न करत आहेत. केरळच्या कोल्लम जिल्ह्यात टोमॅटो फ्लूचा पहिला रुग्ण आढळून आला होता, त्यानंतर तो संपूर्ण प्रदेशात पसरला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -