Tuesday, July 1, 2025

बोरीवलीत चार मजली इमारत कोसळली

बोरीवलीत चार मजली इमारत कोसळली

मुंबई : बोरीवली येथील साईबाबा नगरातील गीतांजली ही चार मजली इमारत आज दुपारी साडेबाराच्या सुमारास कोसळली. ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


प्राथमिक माहितीनुसार, साईबाबा नगर येथील साईबाबा मंदिराजवळ असलेली ४ मजली इमारत दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांनी कोसळली.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली किती जण अडकले आहेत याची माहिती अद्याप कळू शकली नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा