Monday, June 30, 2025

मला पुरुषाची गरज नाही; अभिनेत्री कनिष्का सोनीने स्वतःशी केले लग्न!

मला पुरुषाची गरज नाही; अभिनेत्री कनिष्का सोनीने स्वतःशी केले लग्न!

मुंबई : 'सोलोगॅमी' म्हणजेच स्वतःशी लग्न करणे ही संकल्पना जगभर वेगाने फोफावत आहे. अलीकडेच 'दिया और बाती हम' फेम कनिष्का सोनीने स्वतःशी लग्न केले आहे, ज्यानंतर सोलोगॅमी पुन्हा चर्चेत आले आहे. यापूर्वी गुजरातच्या क्षमा बिंदूने स्वतःशी लग्न केले होते. कनिष्काने १६ ऑगस्ट रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.


कनिष्काने तिच्या सोशल मीडिया हँडलवर भांगात कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेला एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. ती म्हणते, 'मी स्वतःशी लग्न केले आहे. कारण मी माझी स्वप्ने स्वतः पूर्ण करते. मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, ती व्यक्ती मी स्वतः आहे. मला कधीही पुरुषाची गरज भासली नाही.'






 










View this post on Instagram























 

A post shared by Kanishka Soni (@itskanishkasoni)





"मी नेहमीच एकटी आनंदी असते आणि माझ्या गिटारसोबत शांततापूर्ण जीवन जगतेय. मी एक देवी आहे, बलवान आणि सामर्थ्यवान आहे, शिव आणि पार्वती दोघेही माझ्यात आहेत." कनिष्काने तिच्या वाढदिवशी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.


तिला हॉलिवूडमध्ये करिअर करायचे आहे. मीडियाला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत कनिष्काने सांगितले होते की, तिला आता तिच्या अभिनयाला अधिक उंचीवर नेण्याची इच्छा आहे, त्यामुळे तिला हॉलिवूडवर लक्ष केंद्रित करायचे आहे. इतकंच नाही तर कॅनडाच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या शॉर्ट फिल्ममध्येही भूमिका मिळाल्याचे तिने सांगितले होते. यामुळे तिने टीव्ही इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.


टीव्ही अभिनेत्री कनिष्का अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीचा एक भाग आहे. तिने २००७ मध्ये 'बाथरूम सिंगर' या सिंगिंग रिअॅलिटी शोमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. 'दिया और बाती हम', 'दो दिल एक जान', 'बाल वीर', 'भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप', 'बेगुसराय' आणि 'कुल्फी कुमार बाजेवाला' यासह अनेक गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये ती झळकली. काही काळापूर्वी कनिष्काने टीव्ही इंडस्ट्रीला अलविदा केला होता, पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >