Thursday, March 27, 2025
Homeमहामुंबईबेस्टच्या पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उद्या अनावरण

बेस्टच्या पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उद्या अनावरण

मुंबई (वार्ताहर) : बेस्टची पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस सर्व आवश्यक परवानग्यांसह तयार असून लवकरच सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. उद्या गुरुवारी या बसचे अनावरण केले जाणार आहे.

बेस्टने एका खासगी कंपनीला टप्प्याटप्प्याने ९०० इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्याचे कंत्राट दिले असून त्यापैकी ५० टक्के बसेस मार्च २०२३ पर्यंत वितरित केल्या जाणार आहेत. पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बसचे उद्या गुरुवारी अनावरण केले जाणार आहे. पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस आणखी काही चाचण्यांमधून जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सप्टेंबरपासून ती प्रवाशांसाठी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाने दुमजली बस आणि आसन आगाऊ आरक्षित करण्याची सुविधा असलेली प्रीमियम वातानुकूलित बसही दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या गुरुवारी या दोन्ही बसना हिरवा कंदिल दाखविण्यात येणार आहे. मात्र दुमजली बस आणि प्रीमियम बस सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -