
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूने करण ग्रोव्हरसोबत लग्न केल्यानंतर आता सहा वर्षांनी गरोदर आहे. आई होणार असल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला असून तिने बेबी बंप फोटोशूट केलेले फोटो सोशल मीडियावर टाकले असून काही अवधीतच ते जोरदार व्हायरल झाले आहेत. हे फोटोशूट सर्वानाच पसंत आले आणि सगळ्यांचेच लक्ष तिच्या बोल्ड लुककडे आणि बेबी बंपकडे जात होते. याआधी आलिया भट्ट आणि सोनम कपूर हिने आपल्या मॅटर्निटी फॅशनने सगळ्यांनाच इम्प्रेस केले होते.
बिपाशाने अत्यंत बोल्ड अंदाजात मॅटर्निटी फोटोशूट केले आहे आणि त्यात तिचा पती करण ग्रोव्हर देखील दिसून आला. बिपाशाने करणसोबत हॉट अंदाजात हे फोटोज काढून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये तिचे बेबी बंप सुद्धा स्पष्ट दिसत होते.View this post on Instagram
बिपाशा बासूने आपल्या इंस्टाग्रामवर खास मेसेज शेअर करून आपल्या या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटोज सुद्धा सोबत शेअर केले आहेत.View this post on Instagram
तर दुसरीकडे अभिनेत्री आलिया भट्ट सध्या आपली आगामी फिल्म ब्रम्हास्त्रच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्याचवेळी आलिया भट्ट ही प्रेग्नेंसीचे सर्वात गोड दिवस एन्जॉय करत आहे. आलियानेही लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटोज शेअर केले आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram