मुंबई (वार्ताहर) : नवीन आधार मिळविण्यासाठी किंवा आधार अपडेट करण्यासाठी मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांवर आधार काउंटर सुरू करून मध्य रेल्वे डिजिटल इंडिया चळवळीत एक नवीन पाऊल टाकले आहे. हा उपक्रम युआयडिएआय (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) च्या समन्वयाने केला जात आहे.
प्रशिक्षित रेल्वे कर्मचारी हे आधार अपडेट काउंटर चालवतील. नागरिक नवीन आधार मिळवण्यासाठी किंवा विद्यमान आधार अपडेट करण्यासाठी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
नवीन आधार नोंदणी आणि अनिवार्य आधार अपडेट (मुलांसाठी बायोमॅट्रिक इ.) सुविधा मोफत उपलब्ध असतील. आणि इतर पर्यायी अपडेट जसे की मोबाइल नंबर अपडेट, पत्ता बदलण्यासाठी ५०रु शुल्क आकारले जाईल.