वाडा (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या निर्देशानुसार शनिवारी वाडा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर लोकअदालत मधील प्रलंबित दिवाणी व फौजदारी स्वरूपाची ४३९, दाखलपूर्व १७९९ अशी एकूण २२३८ प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याकरीता या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित दिवाणी व फौजदारी स्वरूपाची एकूण ३७ प्रकरणे तडजोड होउन २४ लाख ३१हजार १८५ रुपयांची वसूली झाली. तसेच दाखलपूर्व ५३ प्रकरणांमध्ये तडजोड होउन १३ लाख ४० हजार ७९६ रुपये एवढया रक्कमेची वसूली झाली.
अशाप्रकारे प्रलंबित दिवाणी व फौजदारी तसेच दावा दाखलपूर्व अशा एकूण ९० प्रकरणांमध्ये तडजोड होउन ३७ लाख ७१ हजार ९८१ रुपये एवढया रक्कमेची वसूली झाली. सदर लोकअदालतीस पक्षकार, विविध बँकेचे कर्मचारी महावितरणचे कर्मचारी तसेच ग्रामपंचायत व नगरपंचायत कर्मचारी यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.