Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

इतिहासात पहिलीच वेळ महाराष्ट्रात कुठल्याच तालुक्यात दुष्काळ नाही; एकनाथ शिंदे

इतिहासात पहिलीच वेळ महाराष्ट्रात कुठल्याच तालुक्यात दुष्काळ नाही; एकनाथ शिंदे

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधीपक्षाच्या आरोपांचा समाचार घेतला. इतिहासात पहिलीच वेळ आहे ही की सध्या महाराष्ट्रात कुठल्याच तालुक्यात दुष्काळ नाही असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते दरम्यान, एकनाथ कुठे असा उल्लेख नुकताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता त्यावर बोलताना शिंदे म्हणाले एकनाथ इथेच आहे असे प्रतिउत्तर दिले आहे.


विरोधी पक्षनेत्यांनीही पाहणी केली पण पुर ओसरल्यावर आम्ही ग्राऊंडवर जाऊन काम करणारे लोक आहोत गडचिरोली जिल्ह्यात पुर परिस्थिती असताना आम्ही ती जाऊन पाहणी केली त्यावेळी पाऊस चालू होता हॅलिकॉप्टर पायलेट म्हणाला पाऊस चालु असल्याने आपल्याला जाता येणार नाही त्यावेळी आम्ही तात्काळ बाय रोड जाण्याचा निर्णय घेतला आणि परिस्थितीची पाहणी करून आढावा बैठकही घेतली असही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.


तसेच विरोधी पक्षनेत्यांनीही पाहणी केली पण पुर ओसरल्यावर, असा टोलाही शिंदेंनी लगावला आहे. आम्हाला जनतेचा पाठिंबा आम्ही आकसापोटी कोणतेही निर्णय रद्द करत नाहीत आणि कुठले निर्णय घेणारही नाहीत असा दावा करताना जे निर्णय आडीच वर्षात घेतले ते निर्णय आम्ही आडीच महिन्यात घेतले असा टोला त्यांनी लगावला यावेळी गद्दार विश्वास घातकी लोकशाहीचा गळा घोटला हे सगळे बोलत असले तरी आम्हाला जनतेचा पाठिंबा दिसून आला आहे आणि हा पाठिंबा जनतेने पाहिला आहे.

Comments
Add Comment