Wednesday, April 30, 2025

देशताज्या घडामोडी

अमूल दूध दोन रुपयांनी महागले

मुंबई : गॅस, तेल, भाज्यांचे दर वाढल्यानंतर आता दुधाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. देशभरात दूध पुरवठा करणारी सर्वात मोठी कंपनी अमूलने दूध प्रति लीटर दोन रुपये दरवाढीचा निर्णय घेतला आहे.

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल दुधाच्या दरात चार टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे अमूल दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ होणार आहे.

अमूल ब्रँड अंतर्गत येणारे अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल ताजा यांच्या किमतीत वाढ झाल्यानंतर अमूल दुधाच्या किमतीत एक रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन किमती उद्यापासून म्हणजेच १७ ऑगस्टपासून लागू होतील. याचा अर्थ अमूल गोल्ड ६२ रुपये प्रति लिटर, अमूल शक्ती ५६ रुपये प्रति लीटर आणि अमूल ताजाचा दर ५० रुपये प्रति लिटर होईल. तर अर्धा लीटर अमूल गोल्ड ३१ रुपये आणि अमूल ताजा २५ रुपयांना तर अमूल शक्तीचा दर २८ रुपये असेल.

Comments
Add Comment