Friday, October 4, 2024
Homeदेशजवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; सहा जवान शहीद

जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; सहा जवान शहीद

पहलगाम : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पहलगामच्या चंदनबाडीमध्ये आयटीबीच्या जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जवान शहीद झाले आहेत, तर काहीजण जखमी झाले आहेत. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

बसचे ब्रेक फेल झाल्याने ती अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जवान चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. त्यावेळी हा अपघात घडला.

घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसमध्ये इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाचे ३७ आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे दोन असे ३९ जण प्रवास करत होते. त्यावेळी अचानक पहलगाममधील फ्रिसलन येथे बस दरीत कोसळली. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी जवान तैनात करण्यात येणार होते. त्यासाठी या सर्व जवानांना घेऊन ही बस पहलगामहून चंदनवाडी येथे निघाली होती. त्यावेळी अचानक फ्रिसलन येथे बस २०० फूट दरीत कोसळली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -