Tuesday, July 1, 2025

'जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान'

'जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान'

नवी दिल्ली : 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान', असा नवा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिनी दिला. आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजवंदन केले. यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले.


देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुताम्यांना अभिवादन करत पंतप्रधानांनी देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


लाल बहादूर शास्त्रींनी 'जय जवान, जय किसान'चा नारा दिला. यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी त्यात 'जय विज्ञान' जोडले. आणि आता त्यात 'जय अनुसंधान' जोडण्यात आले आहे.


देशाला संबोधित करताना मोदी यांनी भारतीयांना पाच संकल्प दिले. येत्या काळात आपण 'पंचप्राण' वर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मोदी म्हणाले.





  • पहिले - विकसित भारताचे मोठे संकल्प घेऊन पुढे जा.





  • दुसरे - गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाका.





  • तिसरे - आपल्या वारशाचा अभिमान बाळगा.





  • चौथे - एकतेचे सामर्थ्य.





  • पाचवे - नागरिकांची कर्तव्ये ज्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल.



Comments
Add Comment