औरंगाबाद : एकिकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. घरची परिस्थिती प्रतिकुल असल्याने शेतात मजुरीला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवत गावातीलच सहा नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पीडित अल्पवयीन मुलीला दुपारी ती शेतात जात असताना सहा आरोपींनी तिला रस्त्यात अडवले आणि निर्जनस्थळी नेत आळीपाळीने पीडितेवर अत्याचार केला. यानंतर आरोपी पीडितेला सोडून तिथून पसार झाले. भेदरलेल्या पीडितेला वेदना असह्य होत असल्याने तीने घर गाठत घडलेला प्रसंग आईला सांगितला. आईने क्षणाचाही विलंब न करता पीडितेला सोबत घेत कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे गाठत फिर्याद नोंदविली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणी सर्व सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. यातील काही आरोपींनी यापूर्वी देखील पीडितेची छेड काढत अत्याचार केले होते. मात्र, पीडितेने भीतीने ही बाब कुणालाही सांगितली नव्हती. मात्र सहा नराधमांच्या अत्याचारानंतर असह्य वेदनेमुळे तिने हिंमत करत आईला घडलेला प्रकार सांगितला आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणाचा पुढील तपास औरंगाबाद ग्रामीण पोलीस करत आहेत.
ट्विट करत दाखवलं भारतावरचं प्रेम बंगळुरू : भारतात बंगळुरू येथे २४ मे रोजी होणार असलेल्या एनसी…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या…
आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…
मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…