Friday, June 20, 2025

अंबानींना जीवे मारण्याची धमकी देणारा ५७ वर्षीय संशयित दहिसरमधून ताब्यात

अंबानींना जीवे मारण्याची धमकी देणारा ५७ वर्षीय संशयित दहिसरमधून ताब्यात

मुंबई : मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना तीन तासात जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका संशयिताला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धमकी दिल्याची तक्रार दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि एका संशयिताला दहिसरमधून ताब्यात घेतले.


आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशन हॉस्पीटलच्या सार्वजनिक दूरध्वनी क्रमांकावर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा एक फोन कॉल आला होता. याची तक्रार डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. त्याच वेळी अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली. तर, एका पथकाने धमकीच्या फोनचा तपास सुरू केला. दहिसरमधून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव विष्णू भूमीक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयित आरोपी ५७ वर्षीय असून मानसिक आजारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपी दहिसर पश्चिममधील एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात याआधीदेखील आरोपीविरोधात गुन्हे दाखल आहेत.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानी यांना धमकी देणारे आठ फोन कॉल्स आले होते. या फोन कॉलची चौकशी सुरू करण्यात आली. हे आठही फोन कॉल्स आजच आले. येत्या तीन तासात अंबानी कुटुंबीयांचा खात्मा करणार असल्याची धमकी या दरम्यान देण्यात आली.

Comments
Add Comment