बंगळूर : संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना कर्नाटकमधील शिवामोग्गा या शहरात महोत्सवावर टिपू सुलतान आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पोस्टरवरून वाद झाल्याचे समोर आले आहे. या वादामुळे पोलिसांकडून कलम १४४ लागू करण्यात आला आहे.
शहरातील अमीर अहमद चौकात काही लोकांकडून सावरकरांचे पोस्टर काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. टिपू सुलतान यांच्या समर्थकांनी हे कृत्य केले. यामुळे तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान पोलिसांकडून खबरदारी घेत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हा वाद शांत होण्यासाठी पोलिसांनी काही वेळ लाठीचार्जही केला आहे. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ ही योजना लागू केली. त्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांनी भारताच्या स्वातंत्र्यात टिपू सुलतान यांचे योगदान विसरता येणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता हा वाद पेटला आहे.