नागपुर : १५९ जातींचे कमळ पुष्प व २५० जातींचे गुलाब असलेले शहरात जागतिक दर्जाचे एक मोठे उद्यान साकारणार आहे. या उद्यानामुळे नागपूरच्या वैभवात भर पडेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
हनुमान स्पोर्ट्स ॲकेडमी व जे. डी. स्पोर्ट्स यांच्यातर्फे ‘स्वीमथॉन’ या कार्यक्रमाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. दररोज एक लाख विद्यार्थी मैदानावर खेळले पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न आहेत. शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात आता खेळाचे मैदाने तयार करण्यात येत आहेत. या मैदानावर खेळण्याची संधी त्या त्या भागातील खेळाडूंना मिळेल.
कार्यक्रमाला नासुप्रचे सभापती मनोज सूर्यवंशी, डॉ. उगेमुगे उपस्थित होते. शहरात दिव्यांगांसाठीही एक पार्क तयार करण्यात येत आहे. त्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने जागा दिली आहे. १० ते १२ कोटींचा निधी केंद्र शासन देत आहे. येथे ब्रेन लिपित लिहिलेल्या विविध गोष्टी असतील.