मुंबई : विनायक मेटे यांचे अपघाती निधन हे दुर्देवी घटना आहे. मला खूप दुःख होत आहे. मेटे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. अनेक वेळा त्यांची आणि माझी भेट झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये विकास कामांमध्ये त्यांनी नेहमी भाग घेतलेला आहे. त्यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांचा अपघाती निधन हे महाराष्ट्रचे मोठे नुकसान असून आम्ही आपला एक चांगला मित्र गमावला असल्याची भावना गडकरींनी व्यक्त केली आहे.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. मेटेंच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेटेंच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.
रस्त्यात अपघात होतात त्यामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडतात. भारतीय नागरिकांनी आता संवेदनशील बनायला हवे. या अपघाताचा नेमके कारण मला माहीत नाही. मात्र संपूर्ण भारताला अपघात मुक्त करणे हीच विनायक मेटे यांना वाहलेली खरी श्रद्धांजली असेल, असे म्हणत गडकरींनी शोक व्यक्त केला आहे.