Friday, October 24, 2025
Happy Diwali

मराठा समाजाला नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व आज हरपले; फडणवीस

मराठा समाजाला नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व आज हरपले; फडणवीस

मुंबई : आजचा दिवस खूप दु:खद आहे. राजकारणाची कधीच भरुन न निघणारी हानी झाल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे फडणवीस म्हणाले.

शिवसंग्रामचे नेते, आमचे सहकारी, माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो, अशी प्रार्थना करतो, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

मेटेंचा रात्री सव्वा दोनला मेसेज आलेला, मी येतोय. तुमचा विमानात असल्याने फोन लागला नाही. सकाळी बोलतो. तो मेसेज मी सकाळी वाचला. अपरिमित क्षती. अजून त्यांच्या परिवारातील लोक पोहोचायचे आहेत. कार्यकर्त्यांना अंतिम दर्शन घेण्याचे नियोजन आम्ही करतोय. असे फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment