बीड : शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे पहाटे पाच वाजता अपघाती निधन झाल्यानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांसह बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. आज संध्याकाळपर्यंत विनायकराव मेटे यांचे पार्थिव बीड येथे त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. मेटे यांच्या पार्थिवावर १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता शहरातील कॅनॉल रोडवरील एका शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा हा मोठा धक्का बसल्याने बीड जिल्ह्यातील अजून एक राजकारणातला दर्दी नेता हरवल्याने बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
अंत्यविधी कोठे करायचा, याबाबत कुटुंबियाशी चर्चा करुन अखेर रिलायन्स पेट्रोल पंपामागील कॅनॉल रोडजवळील शेत हे ठिकाण निश्चित करण्यात आले. शिवसंग्राम भवन येथे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके, पो.नि. केतन राठोड यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी अंत्यविधी स्थळाची पाहणी केली.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…