Share

प्रा. प्रतिभा सराफ

एकदा मैत्रिणींबरोबर खेळत होते. आताच्या काळासारखी नवनवीन खेळण्याची साधनं म्हणजेच गेम्स तेव्हा उपलब्ध नव्हते. सर्वसाधारणपणे आम्ही मुले हाताशी असलेल्या वस्तूंमधून खेळणी बनवायचो. असाच एक गमतीशीर खेळ मी खेळत होते. एका लांब दोऱ्याच्या टोकाशी एक दगड बांधून स्वतःभोवती गोल गोल फिरवत होते. माझ्यासोबत तीन-चार मुली होत्या. आळीपाळीने आम्ही प्रत्येकजण तो दगड तसा फिरवून आनंद घेणार होतो. पण तो फिरवत असताना आनंदाच्या भरात माझ्या जाग्यावरून हलले आणि त्यामुळे बाजूला उभ्या असलेल्या मुलींपैकी राणीच्या कपाळावर तो दगड लागला. दगड छोटा होता; परंतु तो सपकन् लागल्यामुळे ती कळवळली. ज्या जागी तो दगड लागला तिथे कपाळावर एक टेंगूळ आला. ती रडू लागली. ती धावतच घरी गेली. जाताना इतकेच म्हणाली की, “माझ्या आईला तुला इंजेक्शनच द्यायला लावते.” तिची आई नर्स होती. त्यामुळे आम्ही राणीशी कधी भांडलो की ती नेहमीच हे म्हणायची आणि आम्ही इंजेक्शनच्या भीतीमुळे तिला टरकून असायचो.

ती घरी गेल्यामुळे मीही पळत घरी आले. घाईघाईत आईला सगळं सांगितलं. राणीची आई भांडखोर होती हे आम्हाला माहीत होतं. शिवाय राणीला दगड लागल्यामुळे ती नक्की भांडायला येणार याची कल्पना होती. अगदी तसेच झाले. पाच मिनिटांच्या आत तिची आई राणीला घेऊन आमच्या दारात आली. तिने बेल वाजवली आणि माझ्या आईशी आवाज चढवून बोलू लागली. माझी आई अतिशय मृदू स्वभावाची आणि त्यातही कधीच न भांडणारी. ती राणीच्या आईला म्हणाली, “सोनीने मुद्दाम दगड मारला नाही. पण तरीही सोनीमुळे राणीला दगड लागला आहे. त्यामुळे मी सोनीला घेऊन येते. तिला काय शिक्षा द्यायची ते तुम्ही देऊ शकता.” असं म्हणून आई घरात गेली. तिने मला हाताला धरून घराबाहेर काढले आणि ती सरळ घरात निघून गेली. खरं तर तावातावाने माझ्या आईशी भांडायला राणीची आई आली होती. पण आईच्या बोलण्यामुळे आणि वागण्यामुळे ती थोडी फार शांत झाली. मी बाहेर येताच राणीच्या आईने माझ्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देत, “केवळ नजरचुकीने माझ्या हातून असे घडले”, असे बोलून मी परत परत “सॉरी”, म्हटले. “खेळताना काळजी घेतली पाहिजे. कुणाला दुखापत होता कामा नये…” वगैरे वगैरे काहीतरी बोलून ती निघून गेली. आईच्या अशा वागण्यातून मी एक धडा घेतला की, आपल्या समस्या आपणच सोडवल्या पाहिजेत.

Recent Posts

काश्मीर खोऱ्यात लपले आहेत ५६ विदेशी अतिरेकी, सूत्रांची माहिती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…

25 minutes ago

OTT: या आठवड्यात फक्त ओटीटीवर अ‍ॅक्शन दिसणार, हे १२ चित्रपट प्रदर्शित होतील..

नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अ‍ॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…

30 minutes ago

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

2 hours ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप..

मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…

3 hours ago

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

4 hours ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

4 hours ago