नवी दिल्ली : दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. देशाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो हे लक्षात ठेवण्यासाठी हा दिवस पाळला जाणार आहे. फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस म्हणून हा दिवस पाळण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती.
दरम्यान, मोदी यांनी ट्विट केले आहे. ‘आज, फाळणी स्मृती दिनानिमित्त, मी फाळणीच्या वेळी ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या इतिहासाच्या त्या दुःखद काळात सहन केलेल्या सर्वांच्या सहनशीलतेचे आणि चिकाटीचे कौतुक करतो.’ अशा आशयाचे ट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी फाळणीच्या वेळी ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Today, on #PartitionHorrorsRemembranceDay, I pay homage to all those who lost their lives during Partition , and applaud the resilience as well as grit of all those who suffered during that tragic period of our history.
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2022
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात १४ ऑगस्ट- फाळणी दिन हा “विभाजन विभीषिका स्मृति दिवस” म्हणून पाळला जाणार आहे. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.