पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; चार दहशतवाद्यांना अटक, राज्यांना अलर्ट जारी

अमृतसर : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी दहशतवाद्यांचा कट उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांच्या मदतीने पंजाब पोलिसांनी चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. पाकिस्तानमधील आयएसएआयच्या दहशत मॉडेलचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. पंजाब पोलिसांनी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा देखील जप्त केला आहे.


पंजाब पोलिसांनी कॅनडातील अर्श डल्ला आणि ऑस्ट्रेलियातील गुरजंत सिंह यांच्याशी संबंधित संघटनेच्या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांकडून ३ हँड ग्रेनेड, १ आयईडी, २ बंदूका आणि ४० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. दहशतवाद्यांकडे आढळलेल्या शस्त्रसाठ्यावरुन मोठ्या घातपाताचा डाव उधळला गेला असल्याचs समोर आले आहे.


अर्श डल्ला हा सक्रिय दहशतवादी आहे. मूळचा पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील आणि आता कॅनडामध्ये राहणारा डल्ला हा अनेक दिवसांपासून गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. पंजाब पोलिसांनी अर्श डल्लाच्या अनेक कृत्यांचा भांडाफोड केला असून त्याच्या जवळच्या साथीदारांना अटक केली आहे. या लोकांकडून यापूर्वीही आयईडी, ग्रेनेड, दारूगोळा आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.


दिल्लीसह देशातील सर्व राज्यांच्या पोलिसांना एजन्सींनी हे अलर्ट जारी केले आहेत. पाकिस्तानातून ड्रोनद्वारे भारताच्या विविध भागात काही आयईडी सापडल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी सर्व राज्यांच्या पोलिसांना, विशेषत: दिल्ली पोलिसांना दिली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

Comments
Add Comment

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान