Monday, September 15, 2025

विनायक मेटेंच्या जाण्यानं मराठा समाजाचं नुकसान; नारायण राणेंनी व्यक्त केलं दु:ख

विनायक मेटेंच्या जाण्यानं मराठा समाजाचं नुकसान; नारायण राणेंनी व्यक्त केलं दु:ख

नवी दिल्ली : विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेबद्दल मी शोक व्यक्त करतो. मी त्यांच्या घरी भेट देणार आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावा, यासाठी त्यांनी आंदोलने केली. त्यांच्या जाण्याने मराठा समाजाचे नुकसान झाले आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आग्रही आणि आक्रमक असे ते नेते होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी विविध मार्ग अवलंबत, आंदोलने करत सतत पाठपुरावा केला, असे नारायण राणे म्हणाले.

विनायक मेटेंच्या मराठा समाजाच्या मागण्यांबाबतच्या आक्रमक भूमिकेचे नारायण राणे यांनी कौतुक केले. आता आपण विनायक मेटेंच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना भेटणार असल्याचे राणे म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट द्वारे विनायक मेटे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

https://twitter.com/MeNarayanRane/status/1558673080976699392
Comments
Add Comment