मुंबई : मुंबईत उद्या तीनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा आहे. कारण पश्चिम रेल्वेवर दिवसा मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
१४ ऑगस्ट रोजी घेण्यात येणारा मेगाब्लॉक हा उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माहीम अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.