नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे खासदार व सरचिटणीस जयराम रमेश यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली. दरम्यान, सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार त्या आयसोलेट झाल्या आहेत. तसेच संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील तीन दिवसांपूर्वी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता सोनिया गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.
याआधी २ जून रोजी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता दुसऱ्यांदा सोनिया गांधी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…
पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…
बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात…