Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

जळगावात ऑनर किलिंग; भावाकडून बहिणीसह प्रियकराची ह्त्या

जळगावात ऑनर किलिंग; भावाकडून बहिणीसह प्रियकराची ह्त्या

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाने त्याच्या बहिणीच्या प्रियकराची गोळी मारून हत्या केली. तर, बहिणीचा गळा घोटून हत्या केली. चोपडा शहरालगत असलेल्या जुना वराड शिवारात या दोघांचेही मृतदेह आढळून आले आहेत. प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड झाल्याचे सांगितले जात आहे.

वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. सुंदरगगढी, चोपडा ) आणि राकेश संजय राजपूत (वय २२, रा. रामपूरा चोपडा) अशी मयत युगलांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा पोलीस तपास करत आहेत.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपडालगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर दोघांचा शोध सुरु आहे.

Comments
Add Comment