मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने मुंबईची चिंता वाढवली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ९ हजार ९७३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८६७ नवे रुग्ण आढळून आले. २०४० नवीन कोरोना रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी २०४० नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८०,७०,२५८ इतके झाले आहेत. राज्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
मुंबईमध्ये आज ८६७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे मनपामध्ये १५९ रुग्ण आढळले. राज्यात इतर ठिकाणी १०० पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. सोलापूर मनपामध्ये आज एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. तर जळगाव, परभणी आणि अमरावती मनपामध्ये फक्त एका कोरोना रुग्णांची नोंद झाली.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या ११८४७ सक्रीय रुग्ण आहेत. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मोठ्या शहरात सक्रीय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईमध्ये चार हजार ६२४ सक्रीय रुग्ण आहेत. तर ठाणे १४०१, पुणे २११९, नागपूर ६५२ सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात सर्वात कमी सक्रीय रुग्ण परभणीमध्ये आहेत. परभणीमध्ये १४ सक्रीय रुग्ण आहेत.