Monday, June 16, 2025

भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर

भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महाराष्ट्र तर आशिष शेलारांकडे मुंबईची जबाबदारी


मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपने त्यांच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे.


भाजपच्या चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपने ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.


आशिष शेलार हे या आधीही मुंबईचे प्रदेशाध्यक्ष होते. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेता त्यांच्याकडे पुन्हा ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Comments
Add Comment