मुंबई : एसटी गळतीच्या बातम्या आपणांस नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र आता मुंबईहून जबलपूरला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या एका विमानाचे छत गळत असल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विमानातील एका प्रवाशाने हा व्हिडिओ सार्वजनिक केला. त्याने या घटनेची हवाई सुंदरी व कॅप्टनकडे तक्रार केली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. एअर होस्टेसने तक्रारदार प्रवाशाला यासाठी आम्ही जबाबदार नाही दुसरीकडे जावून बसा, असे सांगितले.
जबलपूरच्या कमल ग्रोव्हर यांनी सांगितले की, बुधवारी ते स्पाइसजेटच्या फ्लाइट एसजी-३००३ ने मुंबईहून जबलपूरला जात होते. या विमानाने मुंबईहून ४.५५ वा. उड्डाण घेतले. त्यानंतर सायंकाळी ६.५५ वा. ते जबलपूरला पोहोचले. मुंबईत विमानात चढताच विमानाच्या शीट्स पाण्याने भिजलेल्या दिसून आल्या. तासाभराच्या विलंबानंतर विमान आकाशात झेपावल्यानंतरही विमानाच्या छतातून पाणी टपकत होते.
कमल ग्रोव्हर यांनी आपल्या या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सार्वजनिक केला. आपला संपूर्ण प्रवास विमानात पावसाच्या आनंदात गेल्याचे ते म्हणाले.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…