नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत १६ हजार ५६१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये कोरोनाचा आलेख वाढताना दिसत आहे. ११ ऑगस्ट रोजी देशात १६ हजार २९९ नवीन रुग्ण आढळले होते. त्याच्या तुलनेने आज रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण ०.२८ टक्के आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.५३ टक्के आहे.
देशातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता एक दिलासादायक बाब म्हणजे देशात नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर ५.४४ टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी दिवसभरात १८ हजार ५३ रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात एकूण ४ कोटी ३५ लाख ७३ हजार ९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. सध्या देशात १ लाख २३ हजार ५३५ सक्रिय कोरोनाबाधित आहेत.
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई देखील केली जाणार आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
दिल्लीमध्ये कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या २४ तासांत २७०० हून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटीननुसार, गेल्या २४ तासांत २७२६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये यावर्षी २ फेब्रुवारीनंतर एका दिवसांत झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. तसेच, काल दिवसभरात सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीचा पॉझिटिव्हिटी रेट १४.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा आलेख दिवसागणिक वर जाताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिल्लीत मास्कसक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातही पुन्हा एकदा मास्कसक्ती होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…