Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीपुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली; रेल्वे वाहतूक ठप्प

पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली; रेल्वे वाहतूक ठप्प

पुणे : पुणे-मुंबई लोहमार्गावर मंकीहील ते ठाकूरवाडी दरम्यान दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना मध्यरात्री घडलेली असून, अद्याप दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

आज शुक्रवार असल्याने विकेंडमध्ये अनेक जण मुंबई ते पुणे रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र, भल्या पहाटेच घाट परिसरात दरड कोसळ्याने वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. दरड कोसळ्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे.

रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज १२ ऑगस्ट रोजी लोणावळ्या नजिक पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. बोल्डर आणि ओएचईचा खांब पडल्याने मार्ग ठप्प झाला आहे. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

अप लाईनवर ही दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद आहे. अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनकडे वळविण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र अप लाईन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे.

सकाळी सहा नंतर पुण्याहून निघालेल्या रेल्वे खंडाळ्याला थांबल्या आहेत. तर मुंबईहून पुण्याला येणाऱ्या रेल्वे कर्जतला थांबविल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -