Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीनवी मुंबईत बूस्टर डोस घेण्यास नागरिकांचा निरुत्साह

नवी मुंबईत बूस्टर डोस घेण्यास नागरिकांचा निरुत्साह

पालिका आरोग्य विभागाकडून जोरदार जनजागृती

नवी मुंबई (प्रतिनिधी) : मानवी शरीरात प्रतिकारशक्ती टिकावी. तसेच घेतलेल्या दोन्ही डोस मुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ नये. यासाठी बूस्टर म्हणजेच इन्फेक्शननरी डोस विनामूल्य देण्यास पालिका कडून दोन महिन्या पूर्वी प्रारंभ केला. परंतु ज्या प्रकारे कोरोंनाच्या दोन्ही डोसना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्या प्रमाणे प्रतिसाद मिळावा. म्हणून आरोग्य विभागाकडून जनजागृती विविध माध्यमाने केली. परंतु एवढे करूनही नागरिकात निरुत्साह असल्याचे दिसून येत असल्याचे आरोग्य सूत्रांनी सांगितले.

देशाचा पंचाहत्तरावा अमृत मोहत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट पर्यंत बूस्टर डोस ७५ दिवस देण्यास देण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले. त्यानुसर बूस्टर डोस देण्यास ज्यांनी दोन्हीही डोस घेतले आहेत. त्या २६लाखा पेक्षा जास्त नागरिकास सुरुवात देखील झाली. यासाठी पालिकेच्या २३ नागरी केंद्राच्या वतीने अनेक मार्ग चोखाळत जनजागृती पूर्ण परिसरात केली. पण ज्या प्रकारे नागरिकांनी प्रतिसाद देणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे नागरिक बूस्टर डोस घेण्यास येत नाहीत. फक्त प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात दहा ते वीस नागरिक बूस्टर डोस घेतले जातात त्यामुळे दीड लाखांपेक्षा जास्त लोकांनी आताशी बूस्टर डोस घेतली आहे अशी माहिती देखील सूत्रांनी दिली.

पालिकेकडून साधारणतः दीड पेक्षा जास्त वर्षात १८ वर्षांवरील पहिला व दुसरा डोस १०० टक्के दिले आहेत. हे सर्व नागरिक बूस्टर डोस घेण्यास पात्र ठरत आहेत. यामागे पहिला व दुसरा डोस घेतल्यावर ४८ दिवस अँटी बॉडीज आक्रमक असतात. ह्या अँटीबॉडीज जास्तीतजास्त सहा महिन्यां पर्यंत टिकत असतात. पण या कालावधीत जर कोरोना संसर्गाची लागण झाली तर ताप सर्दीवर निभावून जात आहे. तर काहींना कोरोनाची लागण झाली तर कळत सुध्दा नाही असेही वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे.

का घ्यावा बूस्टर डोस..

दोन्ही डोस घेतल्यावर एखाद्याला कोरोनाची लागण झाली नाहीतर सहा महिन्यांनी अँटीबॉडीज कमी होतात. यावेळेला एखाद्याला कोरोनाची लागण झाली तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे बूस्टर डोस घेणे अत्यंत अत्यावश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ञ आपले म्हणणे व्यक्त करत आहेत.

विनामूल्य बुस्टर डोस..

पालिकेच्या विविध रुग्णालयात बुस्टर डोस विनामूल्य दिला जातोच. पण शहरातील डी मार्ट, सहकार बाजार, मॉल या ठिकाणी पालिका परिवहनच्या बसेस उभ्या करून बुस्टर डोस देत आहेत. या बुस्टर डोस साठी फक्त बाहेर देशी जाणारे घटक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत.

बुस्टर डोस घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही नियमित नागरिकांना वेगवेगळ्या परिसरात जाऊन जागृत करत आहोत. परंतु हाताच्या बोटावर मोजण्या इतपत नागरिक येत असतात. तरी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावे. यामुळे त्यांचेच आरोग्य चांगले राहील. डॉ.कैलास गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, पालिका

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -