Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीकोरोना उद्रेक : दिल्लीत पुन्हा मास्क सक्ती

कोरोना उद्रेक : दिल्लीत पुन्हा मास्क सक्ती

नियम मोडणाऱ्यांना ५०० रुपये दंड

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आला आहे. सार्वजनिक ठिकाणी ही मास्क सक्ती असणार असून, नियम मोडणाऱ्यांवर ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार खासगी चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्यांना मास्क अनिवार्य नसणार आहे. मास्क सक्ती नियमाचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

दिल्लीत कोविड-१९ मुळे मृतांची संख्या २६,३५१ इतकी झाली असून, राष्ट्रीय राजधानीत गेल्या एका आठवड्यात कोरोनाच्या नव्या दैनंदिन रूग्णसंख्येमध्ये वाढ नोंदवण्यात आली असून, कोरानामुळे मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे.

काल दिवसभरात दिल्लीत २४९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तसेच, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ८५०६ वर पोहोचली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर १५.४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. दिल्लीमध्ये ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्लीकरांची चिंता वाढवली आहे. देशात पहिल्यांदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दिल्लीतील सार्वजनिक ठिकाणांवर मास्क अनिर्वाय करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने देशात मास्कमुक्ती केली होती. पण पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्याची वेळ आली आहे. अशातच दिल्ली सरकार सातत्याने लोकांना कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे.

देशातही कोरोनाचा चढता आलेख

गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 16,299 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 19,431 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे 1,25,076 सक्रिय रुग्ण आहेत. तर देशाचा पॉझिटिव्हीटी दर 4.58 टक्के इतका आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतात आतापर्यंत 5,26,879 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या आजारातून आतापर्यंत एकूण 4,35,55,041 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड लसीचे एकूण 2,07,29,46,593 डोस देण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -