Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीमहाविकास आघाडी फुटणार?

महाविकास आघाडी फुटणार?

मुंबई : शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी आमदार अंबादास दानवे यांची निवड केल्यानंतर महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला आहे. आम्हाला या निवडीवेळी विश्वासात घेतले नसल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. तर आमची नैसर्गिक आघाडी नाही, ही तात्पुरती आघाडी आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. त्यानंतर पक्षाने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडीवर आता शिक्कामोर्तब झाले असून त्यावर आम्हाला वाद वाढवायचा नाही, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले असून पटोले यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, पक्ष मोठा असल्यामुळे अनेकजण मत मांडत असतात मात्र विधीमंडळात जे ठरेल त्यावरच पक्षाचे कामकाज चालते, असे मत पवार यांनी व्यक्त केले. अंबादास दानवे यांच्या निवडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जाहीर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या उलटसुलट वक्तव्यावरून महाविकास आघाडीत नवा ट्वीस्ट आला असून महाविकास आघाडी फुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, शिवसेनेत बंडाळी झाल्यापासून महाविकास आघाडीतील तिनही पक्षांचे ‘एकला चलो रे’चे धोरण पहायला मिळाले आहे. याचे पडसाद राज्यसभेच्या निवडीवेळी उमटले होते पण ते आता प्रकर्षाने समोर येताना दिसत आहेत. विधान परिषदेच्या निवडीवेळीच महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने अप्रत्यक्षरित्या आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला होता. पण काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यावर आता महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची नाराजी उघड होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -