Wednesday, March 19, 2025
Homeदेशपुण्यातील 'रुपी बँके'चा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द

पुण्यातील ‘रुपी बँके’चा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने पुण्यातील ‘रुपी कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करत २२ सप्टेंबर २०२२ पासून बँकिंग कामकाज बंद करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक माहितीनुसार रुपी कोऑपरेटिव्ह बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नाही असा ठपका आरबीआयने ठेवला आहे.

सारस्वत बँकेत रुपी बँकेचे प्रस्तावित विलीनीकरण आरबीआयकडून तत्त्वत: मंजुरी मिळाल्यानंतरही काही महिन्यांनी झाले. या कारणांचा विचार करत आरबीआयने आज रुपी बँकेवर कारवाई करत परवाना रद्द करण्याचा आदेश दिला आहे. पण असे करत असताना रुपी बँकेच्या खातेधारकांचे पैसे परत केले जातील असे आश्वासन देखील आरबीआयकडून देण्यात आलेले आहे. त्यामुळे रुपी बँकेच्या खातेधारकांना फटका बसणार नाही असे आरबीआयने म्हटले आहे.

रुपी कोऑपरेटिव्ह बँकेने ६४,००० हून अधिक लोकांना त्यांच्या ठेवींची परतफेड केल्यानंतर सारस्वत बँकेने विलीनीकरणाच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विशेष म्हणजे, आरबीआयने आपल्या आदेशात रुपी कोऑपरेटिव्ह बँकेचे कामकाज चालू ठेवणे ठेवीदारांच्या आणि जनतेच्या हिताच्या विरुद्ध असेल आणि बँक तिच्या सध्याच्या आर्थिक स्थितीत सध्याच्या ठेवीदारांची पूर्ण परतफेड करू शकणार नाही असे नमूद केले आहे.

परवानाधारक बँकांमध्ये पैसे ठेवणाऱ्या ठेवीदारांचा ५ लाखांपर्यंतच्या ठेवीचा विमा उतरवला जातो. रुपी कोऑपरेटिव्ह बँकेच्या लिक्विडेशनवर, सध्याच्या ठेवीदारांना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून त्यांचा ठेव विमा दावा प्राप्त करण्याचा अधिकार असेल, असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आदेशातील माहितीनुसार ९९ टक्क्यांपेक्षा जास्त ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम मिळण्याचा अधिकार आहे. तर फक्त १ टक्के ठेवीदार ५ लाखांच्या वरची ठेव गमावतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -