मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत पूरग्रस्तांना केली जाणार आहे. तसचे, एनडीआरएफच्या निकषानुसार पूर्वी २ हेक्टरपर्यंतच नुकसान भरपाई दिली जात होती, त्यातही आता ३ हेक्टरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास १५ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. सर्व नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष बाब म्हणून एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. पूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ६,८०० रुपये दिले जात होते. आता सरकारच्या निर्णयामुळे नुकसानग्रस्तांना १३,६०० रुपये हेक्टरी मदत मिळेल.