पाटणा : बिहार सरकारमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि जनता दल (संयुक्त) यांच्यातील युती संपुष्टात आली आहे. याबाबतची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली.
मागील काही दिवसांपासून युती तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तीव्र राजकीय अटकळींनंतर अखेर युती तोडल्याची घोषणा नितीश कुमार यांनी केली आहे. नितीश कुमार यांनी आज आपल्या पक्षातील सर्व खासदार आणि आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
जेडीयूच्या बैठकीत नितीश कुमार म्हणाले की, भाजपने नेहमीच आम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. भाजपने माझा अपमान केला. २०१३ पासून आतापर्यंत भाजपने फसवणूक केली आहे.
जेडीयूच्या बैठकीनंतर नितीश कुमार थेट राजभवनात पोहोचले, जिथे त्यांनी राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. नितीश यांनी यासह सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्यांनी १६० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर केले आहे.
नितीश हे महाआघाडीचे मुख्यमंत्री असतील – काँग्रेस
नितीश कुमार हे महाआघाडीचे मुख्यमंत्री असतील, असे काँग्रेस आमदार शकील अहमद खान यांनी म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील. काँग्रेसला सभापतीपद मिळू शकते.
फ्लोअर टेस्टसाठी तयारी
युती तुटल्यानंतर नितीश कुमारही आता फ्लोर टेस्टची तयारी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आमदारांना पुढील ७२ तास पाटण्यात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बिहार विधानसभेत जेडीयूचे ४५ आमदार आहेत.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…