Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीरायगड जिल्ह्यातील २२ धरणे ओव्हरफ्लो!

रायगड जिल्ह्यातील २२ धरणे ओव्हरफ्लो!

अलिबाग (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील मधला काहीकाळ सोडला, तर पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोलाड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील एकूण २८ धरणांपैकी २२ धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. यावेळी धोका पोहचू नये म्हणून काही धरणातून पाणी सोडण्यात आले. सहा धरणे अजूनही ओव्हरफ्लोच्या प्रतिक्षेत आहेत. यावेळी जिल्ह्यात जूनमध्ये चांगला पाऊस झाला नाही. मात्र जुलैच्या मध्यानंतर पावसाने जोरदार बॅटींग केली.

त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरण भरली. यामध्ये मुरुड तालुक्यातील फणसाड, तळा तालुक्यातील वावा, रोहा तालुक्यातील सुतारवाडी, पेण तालुक्यातील आंबेघर, सुधागड तालुक्यातील कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, श्रीवर्धन तालुक्यातील कुडकी, म्हसळा तालुक्यातील पाभरे, संदेरी, महाड तालुक्यातील वरंध, कोथुर्डे, कर्जत तालुक्यातील साळोख, अवसरे, खालापूर तालुक्यातील भिलवले, कलोते-मोकाशी वाडी, डोणवत, पनवेल तालुक्यातील मोरबे, बामणोली आणि उसरण ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

उर्वरित अलिबाग तालुक्यातील श्रीगाव धरण ७३ टक्के, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले ६५ टक्के, रानिवली ४६ टक्के, महाड तालुक्यातील खिंडवाडी ९९ टक्के, खैरे ८६ टक्के, तर उरण तालुक्यातील पुनाडे धरणात ९१ टक्के पाणीसाठा जमा असल्याची माहिती कोलाड पाटबंधारे विभागाने खास `दैनिक प्रहार’ला दिली आहे.

ओव्हरफ्लो धरणांतून पाण्याचा विसर्ग

ओव्हरफ्लो झालेल्या धरणांना धोका निर्माण होऊ नये यासाठी २२ ओव्हरफ्लो धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. म्हसळा तालुक्यातील पाभरे धरणांतून अधिकतेने पाण्याचा विसर्ग करण्यात आला, तर सर्वात कमी विसर्ग खालापूर तालुक्यातील डोणवत धरणांतून करण्यात आला.

फणसाड धरणातून ७१५.५०, वावा धरणातून ३११.९१, सुतारवाडी धरणातून ८९४.७६, आंबेघर धरणातून ४६.०६, कोडगाव धरणातून १६९.३६, घोटवडे धरणातून ३९.०१, ढोकशेत धरणातून २३.४०, कवेळे धरणातून १०२.७६, उन्हेरे धरणातून ६०.१८, कुडकी धरणातून २१.५३, पाभरे धरणातून ११८७.४३, संदेरी धरणातून ३०१.४१, वरंध धरणातून ३८३.३२, कोथुर्डे धरणातून २२८.५६, साळोख धरणातून ४.३, अवसरे धरणातून ७.७, भिलवले धरणातून २०८.८७, कलोते-मोकाशी धरणातून १९२.३८, डोणवत धरणातून ३.८३, मोरबे धरणातून १७९.१७, बामणोली धरणातून ५२.५७, तर उसरण धरणातून ३२.७७ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -