मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात १७८२ नव्या रुग्णांची भर पडली आहे तर सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांमध्ये राज्यात १८५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यातील कोरोनाबाधितांची राज्यात आज ११,८८९ इतके रुग्ण सक्रिय असून सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईमध्ये असल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्ये ३१२७ इतके सक्रिय रुग्ण असून त्या खालोखाल पुण्यामध्ये २६७२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात ११२० रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत ७९,०२,४८० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०२ इतके झाले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचे मृत्यू प्रमाण १.८३ टक्के इतके झाले आहे.
देशात गेल्या २४ तासांत १२ हजार ७५१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याआधी रविवारी १८ हजार ७३८ रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. दुसरी चांगली बाब म्हणजे कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सोमवारी दिवसभरात देशात १६ हून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णांची घटती संख्या ही मोठी दिलासादायक बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे.