Thursday, February 12, 2026

आलियाला मुलगा होणार की मुलगी? नाव काय ठेवणार?

आलियाला मुलगा होणार की मुलगी? नाव काय ठेवणार?

मुंबई : आलिया भट्ट गरोदर असल्याचे कळल्यापासून तिचे चाहते बाळाचे आगमन कधी होणार, याचा विचार करत आहेत. तिकडे कपूर कुटुंबही सूनबाईची विशेष काळजी घेताना दिसत आहेत.

एप्रिलमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे धुमधडाक्यात लग्न झाले. त्याचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले. यामुळे चाहते खूश होते, त्यात त्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळाली. ती म्हणजे आलिया गरोदर असल्याची. रणबीर-आलियाने सोनोग्राफी करत असतानाचा फोटो शेअर करून सगळ्यांनाच बातमी दिली होती.

आता अजून एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बाळाच्या आगमनासाठी, अभिनेत्रीच्या डिलिव्हरीसाठी रुग्णालय बुक केले आहे. आलिया भट्टचे बाळ डिसेंबर महिन्यात जन्मणार आहे. कुठल्या हॉस्पिटलमध्ये हे मात्र अद्याप गुप्त ठेवण्यात आले आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Alia Bhatt ?☀️ (@aliaabhatt)

काही दिवसांपूर्वी आलियाला प्रश्न विचारला होता, तुला मुलगा हवा की मुलगी? त्यावर ती हसून म्हणाली होती, बाळ निकोप, निरोगी, आनंदी असावे. एकूणच कपूर कुटुंबात तिची खूप काळजी घेतली जात आहे. नातवंड येणार म्हणून कपूर कुटुंब खूश आहे.

दरम्यान, बाळाचे आगमन कधी होणार? आलियाला मुलगा होणार की मुलगी? बाळाचे नाव काय ठेवणार? याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >