Thursday, June 12, 2025

बाळासाहेबांनी लावलेले झाड कोसळले

बाळासाहेबांनी लावलेले झाड कोसळले

मुंबई : दादर येथील शिवाजी पार्कमधील दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळचे झाड आज सकाळी कोसळले. कोसळलेले हे गुलमोहराचे झाड बाळासाहेबांनीच लावले होते.


शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांच्या सभेला शिवाजी पार्क भरुन जायचा. याच शिवाजी पार्कच्या मैदानावरती बाळासाहेबांनी आपल्या हातांनी एक गुलमोहराचे झाड लावले होते. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे स्मृतीस्थळही याच झाडाच्या जवळ उभारण्यात आले होते.


रविवारी रात्री मुंबईत झालेल्या पावसामुळे शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंनी लावलेले गुलमोहराचे झाड कोसळल्याची माहिती येथे काम करणाऱ्या व्यक्तीने किशोरी पेडणेकर यांना दिली. हे झाड पडल्याने स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सकाळीच स्मृतीस्थळावर जाऊन पाहणी केली. दरम्यान, कोसळून पडलेले गुलमोहराचे झाड शिवाजी पार्कवरतीच पुनर्रोपीत करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment