जळगाव (प्रतिनिधी) : एकमेकांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा व भेटी देत मैत्री दिन साजरा करत असतांना रविवारी युवा जगत जळगावच्या रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट, एमबीए विभागाच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते उमाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विदयार्थी मात्र मैत्री दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण करीत वृक्षांना बँड बांधत त्यांच्याशी मैत्री करण्यात गढून गेले होते.
रायसोनी इस्टिट्युटच्या संचालिका प्रा.डॉ. प्रीती अग्रवाल यांची ही संकल्पना होती. शहरातील रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातर्फे मैत्री दिनाचे औचित्य साधून उमाळा परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात बोलतांना यावेळी रायसोनी इस्टिट्युटच्या संचालिका डॉ. अग्रवाल यांनी प्रत्येक नागरिकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. केवळ झाडे लावून उपयोग नाही, त्यांची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. झाडे आहेत म्हणून आपण आहोत, याचे भान सर्वांनी ठेवावे. वातावरणात ऑक्सीजन निर्माण करण्यासाठी झाडे महत्वाची आहेत. झाडांमुळे जमिनीची व हवेची गुणवत्ता सुद्धा वाढविली जाते हे पटवून देत याबरोबरच वृक्षसंवर्धनाची शपथही विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. अग्रवाल यांनी दिली.
यावेळी वड, पिंपळ, कडूलिंब, गुलमोहर इत्यादी वृक्षांचे वृक्षारोपण उमाळा परिसरात करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईटचे सदस्य यश लढढा, लक्ष्मी शेलार, विवेक पाटील, कांचन माळी, लोकेश पारेख, संभव मेहता, साक्षी वाणी, संदेश तोतला, विवेक वाणी, ज्ञानल बोरोले, काजल बारी, दिव्यांका सोनवणे, पूजा चौधरी, प्राजक्ता पाटील, जयराज चव्हाण, हर्षदा मोगरे, हर्षाली पाटील, जागृती निकम, राधिका दायमा, मंजिरी वाळके, मानसी पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे समन्वय प्रा. श्रिया कोगटा यांनी साधले तर एमबीए विभागप्रमुख प्रा.डॉ. राजकुमार कांकरिया, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. प्राची जगवाणी, प्रा. प्रतीक्षा जैन, प्रा. परिशी केसवानी यांनी सहकार्य केले.